Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » राज्यात बेकायदा मद्य वाहतूक रोखण्यासाठी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना डिजिटल लॉक
महाराष्ट्र

राज्यात बेकायदा मद्य वाहतूक रोखण्यासाठी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना डिजिटल लॉक

अवैधरीत्या मद्य निर्मिती. वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 10, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई प्रतिनिधी : राज्यात बेकायदा मद्य वाहतूक रोखण्यासाठी यापुढे मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर डिजिटल लॉक सिस्टीम बसवण्यात यावी. गुन्हेगारांना वचक बसावा यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेतला.

राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा महत्त्वाचा विभाग आहे. महसूल वाढविण्यासाठी विभागाने नवीन संकल्पना अंमलात आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल वाढवण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.

या विभागातील सेवा हमी कायद्यांतर्गत सूचित केलेल्या १३४ सेवांपैकी ६२ सेवा कार्यान्वित असून उर्वरित ७२ सेवा ऑनलाइन करण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्य प्रणालीमध्ये अत्याधुनिक साधन सामुग्रीचा वापर करण्यात यावा. अवैधरीत्या मद्य निर्मिती. वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleबांगलादेशी नागरिकाला स्थानिक जन्मदाखला प्रकरणी शिरगावचा ग्रामविकास अधिकारी अखेर निलंबित
Next Article लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना ४ लाखांची भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.