Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » मिरा रोड येथील दुकानदार शम्स अन्सारी याची व्यावासायिक वादातून; भावा-बहिणींनी केली हत्या
पालघर

मिरा रोड येथील दुकानदार शम्स अन्सारी याची व्यावासायिक वादातून; भावा-बहिणींनी केली हत्या

सैफ याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली गावठी पिस्तुल, मॅगझीन आणि ९ बुलेट पोलिसांनी केली जप्त.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 6, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

पालघर प्रतिनिधी :  मिरा रोड येथील दुकानदाराच्या गोळी झाडून करण्यात आलेल्या हत्येचा छडा गुन्हे शाखा १ आणि २ च्या पथकाने संयुक्तपणे लावला आहे. फेरिवाल्यांच्या व्यावसायिक वादातून भावा-बहिणींनी ही हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोन आरोपी भावांना अटक केली असून त्यांच्या बहिणीला ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्ष गोळीबार करून फरार झालेल्या हल्लेखाचा शोध सुरू आहे.

मिरा रोड येथील शांती शॉपिंग सेंटर मधील दुकानदार शम्स अन्सारी उर्फ सोनू (३८) याची शुक्रवारी रात्री गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार केले होते. मिरा रोड रेल्वे स्थानकालगत व पादचारी पुलावर अनेक फेरीवाले बसतात. यातील काही फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा देण्यावरून मयत शम्स अन्सारी आणि युसूफ आलम यांच्यात वाद होता. त्यामुळे हत्येनंतर युसूफवर संशय होता.

गुन्हे शाखा २ च्या पथकाने युसूफ आलमच्या बहिणीला ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीतून ती काही सुगावा लागू देत नव्हती. मात्र पोलिसांनी तिच्या मोबाईलची तपासणी केली असता एका पिस्तुलाचे छायाचित्र आढळले. त्यावरून पोलिसांनी तिला बोलते केल्यानंतर तिने या हत्येच्या षडयंत्राची कबुली दिली. हल्लेखोरासोबत असणारा तिचा भाऊ सैफ आलम (२२)  याला नालासोपारा येथील आपल्या घरात लपवून ठेवले होते. त्याला हत्येनंतर ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर गुन्हे शाखा १ च्या पथकाने बदलापूर येथून युसूफ आलम (३४)  याला अटक केली.

याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले की, हत्येच्या दिवशी सैफ आलम आणि हल्लेखोर घटनास्थळावर गेले होते. हल्लेखोराने शम्स अन्सारी याच्यावर गोळीबार केल्यानंतर दोघे ट्रेनने वसईला आले. त्यानंतर सैफने हल्लेखोराला अजमेरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसवले आणि नालासोपार्‍याच्या डॉन लेन मधील बहिणीच्या घरी जाऊन लपला. सोमवारी युसूफ आणि सैफ आलम या दोन्ही आरोपींना सत्र न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील त्यांच्या बहिणीला ताब्यात घेतले असून तिला देखील अटक केली जाणार आहे. सैफ याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली गावठी पिस्तुल, मॅगझीन आणि ९ बुलेट जप्त करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद बल्लाळ, गुन्हे शाखा १ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविराज कुर्‍हाडे, गुन्हे शाखा २ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Article‘माझ्या मुलीला सांभाळा…’ सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्या
Next Article ठाण्यातील एका इमारतीत आग, आपत्ती व्यस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत ३५-४० रहिवाशांचे वाचवले प्राण
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.