Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » कर्नाटकातील अतिक्रमण करणारी मासेमारी नौका रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाच्या ताब्यात
रत्नागिरी

कर्नाटकातील अतिक्रमण करणारी मासेमारी नौका रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाच्या ताब्यात

पकडण्यात आलेल्या नौकांवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा केला प्रयत्न.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 9, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

रत्नागिरी प्रतिनिधी : मलपी कर्नाटक येथील मासेमारी नौकांचे अतिक्रमण केल्याची बाब मच्छीमारांकडून ८ जानेवारी रोजी रात्रौ मिळताच जिल्ह्याची गस्ती नौका गोळप-पावस या दिशेने मार्गक्रमण करण्यात आली. बुधवारी रात्री सुमारे ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान मलपी येथील ३५-४० हायस्पीड ट्रॉलर नौका निदर्शनास आल्या. या नौकांचा पाठलाग करत असता नौका “अधिरा” IND-KL-02-MM5724 या नौकेचा ताबा घेताना इतर नौकांनी गस्ती नौका घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच पकडलेल्या नौकांवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान प्रसंगावधान राखून पकडलेली नौका सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली.

इतर नौकांनी घेरण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य पाहून नौकेवरील कर्मचाऱ्यांनी सदर बाब सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या निदर्शनास आणताच आजूबाजूच्या मासेमारी करणाऱ्या लोकांना संदेश देऊन गस्ती नौकेला मदत करण्यासाठी विनंती करण्यात आली. दरम्यान सदर बाब निदर्शनास स्थानिक मच्छीमार यांच्या निदर्शनास येताच आठ ते दहा मासेमारी लोकांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क करून अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध करून मिरकरवाडा येथील नौके वरून पाठवण्यात आले. मलपी येथील नौकांनी गस्ती नौका मार्गक्रमण करीत असल्याचे पाहताच नौकेवरील दोऱ्या समुद्रात सोडल्या त्यातील दोरी गस्तीनौकेच्या फॅनमध्ये अडकल्याने गस्ती नौका जागेवर बंद पडली. गस्ती नौका बंद पडल्यामुळे इतरत्र नौकांनी हल्ला करण्याचा प्रसंग जीवावर बेतणारा होता. मात्र स्थानिक नौकांची मदत, अतिरिक्त पोलिसांची कुमक या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या. सदरच्या नौकेवर म.सा. मा.नि.अ.१९८१ अंतर्गत दावा दाखल करण्याची कारवाई आज करण्यात येईल.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Article‘द पॉवर ऑफ मीडिया फाऊंडेशन’च्यावतीने रत्नागिरीतील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा
Next Article लेख : श्री क्षेत्र दत्त मंदिर, पालशेत
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.