Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » प्रजासत्ताकदिनी राजपथावर मार्गताम्हाने महाविद्यालयाचे कोळी नृत्य
गुहागर

प्रजासत्ताकदिनी राजपथावर मार्गताम्हाने महाविद्यालयाचे कोळी नृत्य

महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी, ‘अथर्व वेद परंपरा कला मंच रत्नागिरी’चे सहाय्य
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 18, 2025Updated:January 18, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मार्गताम्हाने/प्रशांत चव्हाण : दिल्ली येथे यावर्षी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य महाविद्यालयाला मिळाली आहे. कोकणचे प्रसिद्ध कोळी नृत्य सादरीकरण करण्यात करणार आहे.

‘अथर्व वेद परंपरा कला मंच रत्नागिरी’ यांच्या सहाय्याने २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आपल्या कला-कौशल्याचा ठसा या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उमटवणार आहेत. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राने कोकणातील कोळी नृत्य सादरीकरणाला प्राधान्य दिले असून महाराष्ट्रातून निवडलेल्या ६० कलाकारांनी सादरीकरणामध्ये सहभाग घेतला आहे.

या कोळी नृत्यामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम वर्षात शिकत असणारे प्रगती घडशी, नेहा कोतवडेकर, तन्वी मोहिते व तृतीय वर्षातील भक्ती गुजर, समृद्धी गुजर, अंकिता पवार गेल्या महिन्याभरापासून दिल्ली येथे दिग्गज दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली कोळी नृत्याचा सतत सराव करत आहेत. मार्गताम्हाने सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्वत:ची छाप पाडण्यासाठी मिळालेल्या या संधीबाबत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून या विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हा महाविद्यालयाच्या इतिहासातील अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग नेहमीच दुर्गम भागातील कलागुणांना वाव देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. यामुळे विद्यार्थिनींना आपली कला राष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळाली आहे. या गौरवपूर्ण प्रसंगाने महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला असून, या विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. अथर्व वेद परंपरा कला मंच रत्नागिरी चे प्रमुख श्री लक्ष्मण पडवळ, श्री प्रवीण कदम , श्री प्रथमेश कोतवडेकर यांचे याबाबतीत महाविद्यालयाला विशेष सहकार्य मिळाले आहे.

विद्यार्थिनींच्या या सहभागाबाबत मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब यादव यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleएस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार
Next Article गुहागर पोलिस ठाण्याचे निरिक्षक सावंत यांच्या बदलीसाठी गोरक्षकांचे मे. तहसीलदार, गुहागर यांना निवेदन
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

February 25, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.