मुंबई ,केतन भोज : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून आज साकीनाका येथील सावित्रीबाई फुले शाळेतील मुलींनी मराठी शाळा वाचवण्याचा नारा दिला. हातात फलक घेत मुलींनी यावेळी शासनाकडे मराठी शाळा वाचवा अशी मागणी केली. साकीनाका येथील सावित्रीबाई फुले ही मुलींची शाळा असून 1984 साली तिची स्थापना केली . त्यावेळी शाळेची तीन हजार पट संख्या होतो. शासनाचे मराठी शाळांकडे दुर्लक्ष्य होत असल्याने आज सर्वच मराठी शाळांची दुरवस्था झाली आहे. प्रत्येक मराठी शाळांची पट संख्या कमी होत आहे. साकीनाका येथील सावित्रीबाई फुले या शाळेत यावेळी 185 मुली शिक्षण घेत आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असतात दुसरीकडे मराठी शाळांची पडझड होत आहे दुःखाची बाब आहे. मराठी शाळा टीकल्याच पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही सावित्रीबाई फुले जयंती दिनी ही मागणी केल्याचे शाळेच्या संचालिका ज्योती सुभेदार यांनी सांगितले.
Trending
- गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
- तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
- आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
- अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
- कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
- “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

