Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » ‘द पॉवर ऑफ मीडिया फाऊंडेशन’च्यावतीने रत्नागिरीतील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा
रत्नागिरी

‘द पॉवर ऑफ मीडिया फाऊंडेशन’च्यावतीने रत्नागिरीतील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शालेय जीवनापासून वर्तमानपत्र वाचन सुरु ठेवा - पोलीस उपअधीक्षक निलेश माईणकर
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 6, 2025Updated:January 6, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

रत्नागिरी प्रतिनिधी :  ‘द पॉवर ऑफ मीडिया फाऊंडेशन’ च्यावतीने येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये पत्रकार दिन कार्यक्रम करण्यात आला. पत्रकार भूषण पुरस्कार कोमल कुलकर्णी-कळंबटे यांना तसेच पत्रकार सन्मान पुरस्कार दुर्गेश आखाडे यांना देण्यात आला. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय या विषयावर श्री. माईणकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी दररोज नित्य नियमाने वर्तमानपत्राचे वाचन करावे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, देशामध्ये काय घडत आहे, काय चालले आहे हे वाचावे. योग्य नोंदी ठेवाव्यात. सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी यासारख्या परीक्षांना सामोरे जावे. अभ्यासाबरोबरच इतर कौशल्यदेखील जोपासायला हवीत.

शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची तयारी आसावी. त्यासाठी योग्य वाचन, आकलन आणि नोंदी ठेवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करावे, असे मार्गदर्शन पोलीस उपअधीक्षक निलेश माईणकर यांनी केले.

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, कोणत्याही गोष्टीत सातत्य फार महत्त्वाचे आहे. सातत्य, सराव माणसाला परिपूर्ण बनविते. कौशल्य विकसित करते. त्यामुळे जीवनात येणाऱ्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करते. त्यासाठी सराव हा हवाच. स्पर्धा परीक्षेसाठी चुकून अपयश आल्यास खचून न जाता आपल्यामधील कौशल्याच्या जोरावर नवे करिअर निर्माण करावे.

मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी यांनीही मार्गदर्शन केले…

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन संतोष गार्डी यांनी तर, आभार विनोद गावकर यांनी मानले. कार्यक्रमाला अजय बास्टे, नंदकुमार कुलकर्णी, नरेश पांचाळ, रवींद्र चव्हाण, सजिन सावंत, मेधा कोल्हटकर, सिध्देश मराठे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleठाण्यातील एका इमारतीत आग, आपत्ती व्यस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत ३५-४० रहिवाशांचे वाचवले प्राण
Next Article कर्नाटकातील अतिक्रमण करणारी मासेमारी नौका रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाच्या ताब्यात
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.