Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » रस्ते अपघात कमी करण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात – खासदार सुनिल तटकरे
रत्नागिरी

रस्ते अपघात कमी करण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात – खासदार सुनिल तटकरे

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 3, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

रत्नागिरी वार्ताहार : रस्ते अपघात कमी करण्यासाठी समाज प्रबोधन, समुपदेशन यासह युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी सूचना खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी झाली. बैठकीला खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते.

खासदार श्री. तटकरे म्हणाले, अपूर्ण रस्तांची कामे मर्यादित वेळेत पूर्ण झाली तर काही प्रमाणात अपघातांची संख्या कमी होण्यास मदत मिळेल. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासन अथवा केंद्र शासन यांच्याकडून जे अपेक्षित असेल ते अधिकाऱ्यांनी सांगावे, त्याचा पाठपुरावा केला जाईल. या नव्या वर्षात अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आपण जबाबदारीने सर्वांने मिळून प्रयत्न करु या.

खासदार श्री. राणे म्हणाले, अपघात कमी कसे करता येतील, त्यावर उपाय काय, अपघाताचे कारण काय, असे अपघात पुढे होऊ नये याबाबत अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन कर्पे यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या अनुषंगाने वाहतूक नियमांची माहिती असणाऱ्या चिन्हांची व वाहतुकीस उपयुक्त असणाऱ्या माहिती पत्रकाचे उपस्थितीतांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleश्रमिक मुक्ती संघटनेकडून मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिलांच्या नावाची दखल घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next Article नवी मुंबईतील सानपाडा स्टेशननजीक दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून अज्ञात व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.