मुंबई, महाराष्ट्रातील सेवा सुविधा ज्या आहेत त्या ब्रिटीश कालीन आहे.रेल्वे, नद्यांवरील पूल ,रेल्वेमार्गावरील पूल ,जुन्या इमारती अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील महानगरपालिका त्यांच्या अर्थ व्यवस्थेनुसार नव नवीन सुधारणा करतात. मुंबई महानगरपालिका आपल्या कार्यक्षेत्रात नवीन प्रकल्प मार्गी लावते,ती मुंबईकरांची गरज आहे. पाणी,कचरा,मल:निसारण,वाहतूक आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते.महाराष्ट्र शासनाने मागील काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करून काही नवीन प्रकल्प मार्गी लावले.घाटकोपर-अंधेरी मेट्रो रेल ,चेंबूर- वडाळा मोनो रेल.मेट्रो रेल काळाची गरज होती.पश्चिम उपनगरात जाणार्या प्रवाशांना दादर करून जावे लागत होते.तो वेळ व पैसा वाचला.चेंबूर- वडाळा मोनो रेल तोट्यात गेली प्रवासी संख्या कमी.आता,पुढे संत गाडगे महाराज चौक विस्तार झाल्यावर तुट भरून निघेल. मुंबईतील नवीन भुयारी मेट्रो रेल प्रकल्प एकाच वेळी बर्याच ठिकाणाहून पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.येणारे नवीन प्रकल्प पुढील पन्नास वर्षांची तरतूद आहे.ब्रिटीशांनी दिडशे वर्षापूर्वी बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दररोज ७० लाखाहून अधिक प्रवाशांना उपयुक्त आहे.तेव्हा, आता एवढी लोकसंख्या नव्हती.मुंबई- नवीन मुंबई अटल सेतू वरून १८ मिनिटात जाता येते.आता,वाहनचालक मोफत टोल असल्यामुळेच तेथून जाणे टाळाटाळ करीत असावेत. मोनो रेल, मेट्रो रेल येथील रस्ते प्रवाशांच्या करिता मोकळे असावेत.सर्वच ठिकाणचे रस्ते फेरीवाले,विक्रेते यांनी व्यापले आहेत. घाटकोपर मेट्रो रेल पुलाखाली प्रवाशांना चालता येत नाही.दुकाने ,फेरीवाले,विक्रेते कुठून आणि कसे आले.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत त्यांच्या निर्णयावर प्रवाशांचे आणि प्रकल्पांचे भवितव्य अवलंबून आहे.करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले प्रकल्प जनतेच्या सेवेसाठी आहेत म्हणून मार्गातील अडथळे मुख्यमंत्र्यांनीच दूर करावेत.
Trending
- गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
- तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
- आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
- अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
- कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
- “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

