Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रामपूर येथे CRA तंत्रज्ञानाद्वारे काजू पिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक
  • नवी मुंबईतल्या DPS शाळेच्या बस चालकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
  • वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
  • सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा – जिल्हाधिकारी एम, देवेंदर सिंह
  • ‘चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान’प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेत कु. वेद सुनील शिंगाडे प्रथम !
  • शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
  • आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रा पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविकांची उपस्थिती
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » लोकनेते शामराव पेजे हे एक मोठे नेतृत्व – उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी

लोकनेते शामराव पेजे हे एक मोठे नेतृत्व – उद्योगमंत्री उदय सामंत

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 18, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram
रत्नागिरी प्रतिनिधी : पारदर्शीपणाने स्वत:चे नेतृत्व कसे जपावे हे लोकप्रतिनिधींना पहावयाचे असेल तर, त्यांनी लोकनेते पेजेंच्या चरित्राचा अभ्यास करावा, एवढे मोठे त्यांचे नेतृत्व होते. परदेशात गेल्यानंतर त्यांचा देश स्वच्छ रहावा, म्हणून आपण तेथील नियमांचे काटेकोर पालन करतो. त्याचेच अनुकरण करुन आपला परिसर, आपले महाविद्यालय स्वच्छ ठेवावे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
लोकनेते शामराव पेजे जयंती निमित्त येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य यु. व्ही. पाटील, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एम. शिंदे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश बंगाळे, लोकनेते शामराव पेजे यांचे चिरंजीव शिरीष पेजे, नातू विकास पेजे आणि कुटुंबीय उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, लोकनेते शामराव पेजे यांचे नाव अभियांत्रिकी महाविद्यालयाला का दिले, याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती करुन घ्यावी. पारदर्शीपणे स्वत:चे नेतृत्व कसे जपावे, हे खासदार आमदारांना पहावयाचे असेल तर त्यांनी रत्नागिरीत येऊन लोकनेते शामराव पेजे यांच्या चरित्राचा अभ्यास करावा लागेल, एवढं मोठे त्यांचे नेतृत्व होते.
देशातला पहिला थ्री डी मल्टीमीडिया शो थिबा पॅलेस परिसरात होत आहे. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा इतिहास जाणून घ्यावा. जगभरातील पर्यटक आपले तंत्रज्ञान आणि शो पहायला येतील. यामध्ये या भूमीचा, महापुरुषांचा इतिहासाची माहिती पहायला मिळेल.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्व सुविधा सुरु कराव्यात. विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह आपल्या सर्वांची परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे. शौचालये, स्वच्छतागृहे अतिशय स्वच्छ ठेवली पाहिजेत. परिदेशात गेल्यावर त्यांचा देश स्वच्छ रहावा, म्हणून तेथील कडक नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. त्याचेच अनुकरण आपल्या देशातही सर्वांनी करावे, असेही उद्योगमंत्री म्हणाले.
Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleदेशातील प्रमुख शहरात ‘विवाहपूर्व समुपदेशन केंद्र’ उभारण्याचा राष्टीय महिला आयोगाचा निर्णय
Next Article राष्ट्रीय महामार्ग ६६ चौपदरीकरण १९ खोकेधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोबदला वाटप
Team GuhagarSatta

Related Posts

महाराष्ट्र

जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा – जिल्हाधिकारी एम, देवेंदर सिंह

April 7, 2025
महाराष्ट्र

शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

April 7, 2025
गुहागर

गुहागर मधील ७ वर्षाच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

March 25, 2025
Top Posts

कविता : वायरमन..!

January 13, 2025133 Views

साहित्यिक प्रकाशक यांचा एकमेकांशी सुसंवाद असावा -डॉ. अ. ना. रसनकुटे

March 31, 2025114 Views

वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

April 26, 2025102 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2025 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.