चल मित्रा गाव फिरून येवू,
धावपळीच्या जीवनाला आज सुट्टी देवू..!
तुडवू तिथल्या तोडक्या मोडक्या वाटा,
गावात आहे आजही माणुसकीचा साठा..!
शहरे झाली जरी कितीही चकचकीत,
गावचा म्हातारा आजही आहे टकटकित..!
झाडा माडांच्या बनात वसलेली वाडी,
उंच उंच डोंगरामधूनी पळवू गाडी..!
मारळचा मार्लेश्वर,गणपतीपुळ्याचा लंबोदर पाहू,
त्याच्या चरणाशी लाल जास्वंद वाहू..!
चल मित्रा गाव फिरून येवू,
एक मैफिल गावच्या खळ्यात घेवू..!
-काव्यांकुर (अंकुर कनगुटकर)

