सातारा वार्ताहार : नायगाव, ता. खंडाळा येथे आयोजित ‘सावित्रीमाई जयंती उत्सव’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळींचे नेतृत्व सावित्रीबाईफुले यांनी केले. थोर माणसांचे कार्य कधीही संपत नाही, त्यांचे स्मारक उभारताना पुतळ्यासोबतच विचारांचेही स्मारक झाले पाहिजे, असेही मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाईफुले यांच्या जन्मस्थळी असलेल्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ शिल्पसृष्टीचीही पाहणी केली. या ठिकाणी स्मारक उभारणी आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त नायगाव, ता. खंडाळा येथे आयोजित सावित्रीमाई जयंती उत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार सर्वश्री छगन भुजबळ, अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले आदी मान्यवर उपस्थित होते.

