Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » ‘स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड ही योजना लोकांसाठी संजीवनी ठरेल’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे

‘स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड ही योजना लोकांसाठी संजीवनी ठरेल’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्डमुळे जागेची हद्द, घरांची हद्द आणि सीमांकन याबद्दल चे वाद संपुष्टात येतील आणि त्याचबरोबर प्रत्येकाला मालकी हक्क मिळेल. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र नाही तर देशासाठी ऐतिहासिक आहे, असे शिंदे म्हणाले.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 18, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

ठाणे प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील ५० हजार गावांमधील ५८ लाख लाभार्थींना स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरण करण्यात आले. ऑनलाईनद्वारे झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथून सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते देखील ठाणे जिल्ह्यातील स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टिका केली. स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड चे वाटप ऑनलाइनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ५० हजार गावांमध्ये ६५ लाख ग्रामस्थांना या प्रॉपर्टी कार्डचे वितरण झाले. या कार्डमुळे जागेची हद्द, घरांची हद्द आणि सीमांकन याबद्दल चे वाद संपुष्टात येतील आणि त्याचबरोबर प्रत्येकाला मालकी हक्क मिळेल. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र नाही तर देशासाठी ऐतिहासिक आहे, असे शिंदे म्हणाले.

प्रॉपर्टी कार्डमुळे अनेकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आणि त्यांनी व्यवसायात प्रगतीही केली आहे. अतिशय ऐतिहासिक अशी हि योजना आहे. यापुर्वीच ही योजना राबविणे गरजेचे होते. परंतु ५० ते ६० वर्ष काँग्रेसचे सरकार होते आणि त्यांनी देशातील लोकांना वंचित ठेवले, अशी टिका त्यांनी केली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. २०२२ मध्ये त्यांनी स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड योजनेची सुरूवात केली. त्याला मूर्त रूप आले आहे. गाव समृद्ध झाले की देश समृद्ध होतो, म्हणूनच देशाचा विकास करायचा असेल तर गावापासून करायला हवा. त्याचीच सुरूवात या योजनेच्या माध्यमातून झाली आहे. देशासह राज्यातील नागरिकांना योजनाचा फायदा होईल आणि त्यांच्यासाठी ही योजना संजीवनी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleगुहागर पोलिस ठाण्याचे निरिक्षक सावंत यांच्या बदलीसाठी गोरक्षकांचे मे. तहसीलदार, गुहागर यांना निवेदन
Next Article बसमध्ये बोलण्यात गुंतवून ३ महिलांनी लाखोंचे दागिने अन् रोकड चोरली
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.