Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रामपूर येथे CRA तंत्रज्ञानाद्वारे काजू पिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक
  • नवी मुंबईतल्या DPS शाळेच्या बस चालकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
  • वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
  • सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा – जिल्हाधिकारी एम, देवेंदर सिंह
  • ‘चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान’प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेत कु. वेद सुनील शिंगाडे प्रथम !
  • शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
  • आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रा पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविकांची उपस्थिती
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा मोजणीसाठी अर्ज दाखल
ठाणे

ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा मोजणीसाठी अर्ज दाखल

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaNovember 30, 2024No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा निवडणुकीतील ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दहा व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजणीसाठी अर्ज केला आहे. या प्रक्रियेसाठी लागणारी चार लाख ७२ हजार रुपयांची रक्कम उमेदवार म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरणा केली आहे. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डोंबिवलीत ईव्हीएम विरुद्ध आंदोलन सुरू केले असून त्या आंदोलनाचा भाग म्हणून शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

शहरातील सामान्य नागरिकांनी ईव्हीएम विरोधात रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकांच्या मागणीचा विचार करून डोंबिवली शहराच्या विविध भागात ठाकरे गटाकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून ईव्हीएम यंत्राऐवजी कागदी मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे, असे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

डोंबिवली विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतदानाच्या दिवशी बाहेर आलेले आकडे पाहता, त्यात तफावत दिसून आली आहे. त्यामुळे आपण १० व्हीव्हीपॅट यंत्रांमधील मते पुनर्मोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी लागणारे शुल्क जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरणा केले आहे, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेमुळे पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीव्हीपॅट यंत्रातील मते मोजणीसाठी ठिकाण आणि तारीख निश्चित केली जाईल, असे ते म्हणाले. मतदान प्रक्रियेत गडबड होत असल्याचे पुरावे बाहेर आले आहेत. लोकशाही टिकविण्यासाठी आणि जनतेच्या विश्वासाला धक्का लागणार नाही यासाठी आम्ही हा लढा देत आहोत, असे माजी सभापती आणि पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. या मतमोजणी प्रक्रियेवरून डोंबिवलीत ठाकरे पक्ष आणि भाजपमधील धुसफूस पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleआता दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेटसक्ती, वाहतूक विभागाचे आदेश
Next Article जिल्ह्यातील बांगला देशींना ‘हद्दपारी’चा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शासनाला पाठवला प्रस्ताव
Team GuhagarSatta

Related Posts

नवी मुंबई

नवी मुंबईतल्या DPS शाळेच्या बस चालकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

April 26, 2025
ठाणे

वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

April 26, 2025
महाराष्ट्र

सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 7, 2025
Top Posts

कविता : वायरमन..!

January 13, 2025133 Views

साहित्यिक प्रकाशक यांचा एकमेकांशी सुसंवाद असावा -डॉ. अ. ना. रसनकुटे

March 31, 2025114 Views

वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

April 26, 2025102 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2025 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.