Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रामपूर येथे CRA तंत्रज्ञानाद्वारे काजू पिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक
  • नवी मुंबईतल्या DPS शाळेच्या बस चालकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
  • वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
  • सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा – जिल्हाधिकारी एम, देवेंदर सिंह
  • ‘चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान’प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेत कु. वेद सुनील शिंगाडे प्रथम !
  • शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
  • आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रा पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविकांची उपस्थिती
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » ठाणे, पालघर येथील खाडी आणि समुद्र क्षेत्रात अनधिकृत मासेमारी, नौकांवर ड्रोनद्वारे राहणार लक्ष
ठाणे

ठाणे, पालघर येथील खाडी आणि समुद्र क्षेत्रात अनधिकृत मासेमारी, नौकांवर ड्रोनद्वारे राहणार लक्ष

ड्रोनची मदतिने नौकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मत्स्य व्यवसाय विभाग सज्ज झाल आहे.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 10, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

ठाणे प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठीच्या कायद्याच्या आधारे ठाणे आणि पालघर येथील खाडी आणि समुद्र क्षेत्रातील अवैध मासेमारी आणि अनधिकृतपद्धतीने शिरणाऱ्या नौकांवर लक्ष ठेवण्यासाठी आता ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून ड्रोनची मदत घेण्यात येणार येणार आहे. ड्रोनचा वापर करुन मासेमारी नौकांची मॅपिंग करुन झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होणार आहे. तर ड्रोनद्वारे किनारपट्टीवरील जलधी क्षेत्र देखरेखीखाली येणार असून वापरण्यात येणारे ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत, जेणेकरुन सागरी सुरक्षा बळकट होण्यास देखील मदत होणार आहे.

सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांमार्फत गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते. गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही. तसेच अनधिकृत नौकांचा पाठलाग करीत असताना त्या पळून जात असतात. अशा नौकांना पकडणे जिकरीचे होत असते. गस्ती नौकेसोबतच राज्याच्या जलधीक्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अशा नौकांवर सागरी कायद्यांतर्गत कठोरपणे कारवाई करणे सोईचे होईल. तर ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे. ड्रोनचा वापर करुन मासेमारी नौकांची मॅपिंग करुन झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होवू शकेल, ड्रोनद्वारे राज्याच्या किनारपट्टीवरील जलधी क्षेत्र देखरेखीखाली येणार असून वापरण्यात येणारे ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत, जेणेकरुन सागरी सुरक्षा बळकट होण्यास देखील मदत होईल. या ड्रोन प्रणालीद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर नजर ठेवून अशा नौकांची माहिती पुराव्यासह उपलब्ध करून कार्यवाही करण्याकरिता ड्रोन प्रणालीच्या वेवसोल्यूशन – स्ट्रिमींगचा पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील ७ सागरी जिल्ह्यांकरिता एकूण ९ ड्रोनची (शिरगाव – पालघर (१ नग), उत्तन – ठाणे (१ नग), गोराई – मुंबई उपनगर (१ नग), ससून डॉक – मुंबई शहर (१) नग), रेवदंडा व श्रीवर्धन रायगड (२ नग), मिरकरवाडा व साखरीनाटे रत्नागिरी (२ नग) आणि देवगड-सिंधुदूर्ग (१ नग) सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन घेण्यात आली आहे. आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleनालासोपाऱ्यात बॉडी स्प्रे चा भीषण स्फोट, एकाच कुटुंबातील ४ जण गंभीर जखमी
Next Article वाढवण बंदरासाठी जमीन हस्तांतरण, आवश्यक परवानगीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत; मुख्यमंत्र्यांचा सक्त आदेश
Team GuhagarSatta

Related Posts

नवी मुंबई

नवी मुंबईतल्या DPS शाळेच्या बस चालकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

April 26, 2025
ठाणे

वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

April 26, 2025
महाराष्ट्र

सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 7, 2025
Top Posts

कविता : वायरमन..!

January 13, 2025133 Views

साहित्यिक प्रकाशक यांचा एकमेकांशी सुसंवाद असावा -डॉ. अ. ना. रसनकुटे

March 31, 2025114 Views

वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

April 26, 2025102 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2025 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.